अल्पसंख्याक विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांची हज हाऊसला भेट – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर, दि. १२ – अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने किल्ले अर्क, व्ही.आय.पी. रोड येथील हज हाऊसला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.

    हज यात्रेकरूंच्या सुविधा, प्रशासकीय व्यवस्था आणि आगामी नियोजनाचा आढावा घेणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.या दौऱ्यादरम्यान अल्पसंख्याक विकास विभाग व हज कमिटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या आयुक्त प्रतीभा इंगळे, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फयाझ खान , उपायुक्त ख्वाजा अश्रफ, प्रतिभा चौधरी, जुनेद सय्यद, कक्ष अधिकारी खदिजा नाईकवाडे, लेखा अधिकारी शोएब मुसा शेख,रशीद शेख उपस्थित होते.

    त्यांनी यावेळी हज हाऊसमधील पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि प्रशासकीय कामांची सविस्तर पाहणी केली. यात्रेकरूंना उत्तम सेवा मिळावी यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केल्या.

    ००००

    - Advertisement -