
मुंबई, दि.12: भारतीय संगीत क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या आशाताई भोसले यांच्या जाण्याने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. आज देह रुपाने त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या सुरेल आवाजाच्या रूपात त्या सदैव अजरामर राहतील, अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्या आपल्या संदेशात म्हणतात, आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंनी मराठी, हिंदी, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन संगीताची अविरत सेवा केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. आशाताई भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्राने एक अमूल्य रत्न गमावले असून, त्यांच्या आठवणी आणि गाणी पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
00000

















WhatsApp