Home बातम्या राजकारण प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

0

प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन दिला पाठिंबा

पुणे : परवेज शेख शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर दिला शिवसेनेला पाठिंबा

सर्वसामान्य नागरिकांच्या , आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने शिवसेनेला पाठिंबा

प्रहारचे संस्थापक आमदार बचू कडू, ( अचलपूर ) आणि आमदार राजकुमार पटेल ( मेळघाट ) यांनी पाठिंब्याचे दिले पत्र

प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची बचू कडू यांची ग्वाही