पुणे : परवेज शेख अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे कोर्स पूर्ण केलेल्या उत्कृष्ट कमांडोंना ट्रॉफी प्रदान करताना श्री सुबोध जयसवाल, महासंचालक, महाराष्ट्र पोलीस यांनी कमांडोंना अभ्यासक्रमाच्या काळात शिकवलेल्या कौशल्यांचा उपयोग नक्षलवादाच्या सामन्याकरिता करण्यास प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी ऑपरेशन) श्री रविंद्र कदम, पोलिस उप महानिरीक्षक श्री तांबडे, पोलिस अधीक्षक गोंदिया, श्री मंगेश शिंदे, एसआरपीएफ गट १३ कमांडंट निखिल पिंगळे ही उपस्थित होते.