Home ताज्या बातम्या नवीन गाडी घेताय? एकदा ‘हा’ विचार करा!

नवीन गाडी घेताय? एकदा ‘हा’ विचार करा!

0

नवीन गाडी घेताय? एकदा ‘हा’ विचार करा!

नवीन गाडी विकत घेण्याआधी काही बाबींचा विचार करणे जरुरी आहे. या गोष्टी कोणत्या? त्या पारखून घेण्याची गरज काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहुयात…  

नवीन गाडी घेण्याआधी सर्वांनाच पडणारा एक मुख्य प्रश्न म्हणजे, गाडी कुठली घेऊ? कारण बजेट ठरलेलं असतं. अशात एक गाडी निवडताना कसोटी लागते. अशा वेळी काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे तयारच असायला हवीत…

1. *स्वत:लाच काही प्रश्न विचारा* : यात प्रामुख्याने पहिला प्रश्न येतो तो तुमच्या बजेटचा! गाडी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता? या प्रश्नावर तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कारण बजेट ठरल्यावर गाडीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होते. 

2. *मासिक हप्ता आणि गणित* : त्यापुढचा प्रश्न म्हणजे कर्ज काढून गाडी घेणार असू, तर मासिक हप्ता किती रुपयांचा असणार आहे? या मासिक हप्त्याच्या गणितावर पुढील काही वर्षांचे तुमचे बजेट अवलंबून असते. त्यानंतर तुम्हाला हॅचबॅक गाडी घ्यायची आहे, सेडान गाडी की, एसयूव्ही प्रकारातील गाडी घ्यायची आहे, हा प्रश्न उत्तरित काढायला हवा. 

3. *जीवनशैली आणि गरज* : यानंतरचा प्रश्न म्हणजे माझ्या जीवनशैलीसाठी कोणती गाडी आवश्यक आहे? त्या गाडीची आपल्या दैनंदिन जीवनातील गरज किती, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. गाडीत असणाऱ्या सुविधांवर गाडीची किंमत वरखाली होऊ शकते. त्याचा विचार करा. 

4. *नियोजन आणि शोध* : तुम्ही एखाद्या गाडीसाठी किती पैसे खर्च करणार आहात, याचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन असायला हवे. तुम्ही गाडी निवडलीत की तिची किंमत आणि ती गाडी विक्रेत्यांचा शोधही महत्त्वाचा असतो. गाडी विक्रेता शक्यतो तुमच्याच शहरात असावा. 

5. *सणाचा फायदा घ्या* : सणावाराच्या आसपास गाडी घेण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण या दरम्यान विविध आकर्षक ऑफर सुरु असतात. म्हणून गाडी घेताना काही सूट किंवा सवलत मिळू शकते का? हे तपासून घ्या.

6. *रिव्ह्यू पहा* : नेमकी कोणती गाडी घ्यायची? हे ठरवण्यासाठी विविध गाड्यांचे रिव्ह्यू वाचणे कधीही चांगले. कारण तज्ज्ञांनी रिव्ह्यू लिहिले असल्याने गाडीच्या तांत्रिक अंगांची सखोल माहिती त्यातून मिळते. 

7. *तुलना करा* : विविध संकेतस्थळांवर दोन गाड्यांची तुलना करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने तुम्हाला आवडलेल्या दोन किंवा तीन गाड्यांची एकाच वेळी तुलना करणेही शक्य आहे. यामुळे कोणत्या गाडीत नेमक्या कोणत्या गोष्टी जास्त आहेत किंवा दोन गाड्यांच्या किमतीमधील फरक का आणि किती आहे, हे तुम्हाला सहज समजू शकेल.

8. *विमा कंपनी निवडताना* : गाडी घेतल्यानंतर विमा कंपनीची निवड काळजीपूर्वक करायला हवी. कोणती विमा कंपनी किती पैशांत काय-काय विमा सुरक्षा देते? हे तपासून बघा. त्यासाठी आता अनेक संकेतस्थळे आहेत.

सगळं ठरल्यानंतर गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या. यामुळे निवडलेली गाडी वापरणे सोपे आहे का? सर्व गोष्टी या गाडीत आहेत का? गाडीची इंजिन क्षमता कशी आहे? या सर्व गोष्टींची तपासणी या ड्राईव्हदरम्यान करायला हवी. मग गाडी घ्यायला काही हरकत नाही.