
मुंबई, दि. २७ : एकल महिला सक्षमीकरण धोरण अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात येत आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आणि शासकीय विभागांनी अभिप्राय द्यावेत, अशा सूचना महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
एकल महिला सक्षमीकरण व संरक्षण धोरणासंदर्भात आयोजित दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी व अशासकीय सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, धोरण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सदस्यांनी मांडलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. या धोरणात आणखी कोणत्या उपयुक्त बाबींचा समावेश करता येईल, याचा विचार करावा. त्यासाठी सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करावी.
सर्वेक्षणाची व्याप्ती वाढविण्याची गरज अधोरेखित करताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/विसंअ

WhatsApp