Home गुन्हा वाहतूक पोलिसाला धमकी आणि मारणारा अटक

वाहतूक पोलिसाला धमकी आणि मारणारा अटक

0

पुणे : परवेज शेख सहकारनगर वाहतुक विभागाचे पोलिस नाईक
राहुल गोसावी
हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आरोपी गणेश
यशवंत चव्हाण (वय२२, रा. बिबवेवाडी), एक महिला (वय ४०,
रा. सदर) त्याना मारहाण करून सरकारी कामात अडथळा
आणला म्हणून अटक केली आहे. सदर घटना २७ ऑक्टोबर
२०१९ रोजी दुपारी १२/१० वाजता चंद्रलोक हॉस्पिटल चौक
बिबवेवाडी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोसावी वाहतुक नियमन करत

असताना त्यांनी आरोपीना कागदपत्रे विचारली याचा राग येऊन
फिर्यादीस तुझी नोकरी घालवतो अशी धमकी देऊन मागे
बसलेल्या महिलेने फिर्यादीच्या तुला काय करायचे ते कर मी तुला
बघून घेते म्हणून त्याच्या डाव्या गालावर मारून गोंधळ घालून
सरकारी कामात अडथळा आणला. पुढील तपास चालू आहे.