Home पोलीस घडामोडी मस्तच…! पिझ्झा डिलिव्हरीला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेेळेत पोहोचणार पोलीस

मस्तच…! पिझ्झा डिलिव्हरीला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेेळेत पोहोचणार पोलीस

0

यावेळी उत्तर प्रदेशचे 100 क्रमांकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितेल की, जो पर्यंत 100 नंबरवर एक टक्का फोन येत राहतील तोपर्यंत ही लाईन सुरू ठेवण्यात येईल.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी दोन विशेष मोहिमा आणल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योगी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या 100 मुख्यालयामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी 112 क्रमांकाची आपत्कालीन सेवा ‘सवेरा पहल’ ही मोहिम सुरू केली आहे. 


यावेळी उत्तर प्रदेशचे 100 क्रमांकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितेल की, जो पर्यंत 100 नंबरवर एक टक्का फोन येत राहतील तोपर्यंत ही लाईन सुरू ठेवण्यात येईल. कारण हा नंबर विसरणे लोकांना आता अशक्य आहे. 112 ही आपत्कालीन सेवा आहे आणि ती देखिल 100 नंबर प्रमाणेच काम करेल. वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सेवेचे मोठे योगदान असणार आहे. या नंबरवर फोन करून वरिष्ठ नागरिकांनी नोंदणी करावी, यानंतर तीन दिवसांत संबंधित पोलिस ठाण्यांमधून पोलिस या नागरिकाच्या भेटीला जाणार आहेत. तसेच त्यांच्याबाबतची माहिती ते नोंद करून घेणार आहेत. 

आपत्कालीन सेवा सुरू केल्यानंतर योगी यांनी सांगितले की, यापुढे काही काळापर्यंत 100 आणि 112 सेवा एकत्र चालतील. मात्र, नंतर बंद होतील. मुख्यमंत्री कार्यालयानुसार 108 आणि 102 वैद्यकीय सेवा, 1090, 181 महिला मदत, मुख्यमंत्री मदत, फायर आदी सेवा एकमेकांना जोडण्याच्या दिशेने एक चांगले उदाहरण बनू शकते. 


तर एडीजी यांनी सांगितले की, जे लोक 112 सोबत जोडू इच्छितात ते नोंदणी करू शकतात. ही योजना पूर्णत: स्वैच्छिक आहे. यावेळी डीजीपी ओ पी सिंह यांनी सांगितले की, 112 एक देश, एक नागरिक आणि एक सेवेच्या रुपात काम करणार आहे. याद्वारे रिस्पॉन्स वेळ चांगला असणार आहे. पिझ्झा डिलिव्हरीला जेवढा वेळ लागतो त्याच्या आधीच पोलिस तुमच्याकडे पोहोचणार असल्याचे सिंह म्हणाले.