Home अश्रेणीबद्ध पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

0

पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पुणे : परवेज शेख पुणे दिनांक 30 ऑक्टोम्बर पुणे शहरात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) यांच्या माध्यमातून खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेचे चेहरामोहरा बदलवून, कर्तव्यदक्ष व अतिसंवेदशील आणि अत्याधुनिक गोष्टींचा वापर करून तसेच विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून, सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीची तात्काळ माहिती तसेच गुन्हेगारांवर खासदुत म्हणून कर्दनकाळ ठरलेले, पुणे शहरातील पोलीस ठाणे पी-४ च्या साहयाने सुरक्षा रक्षकांना जोडून स्मार्ट करण्यावर भर देण्यात आले आहे त्यात स्मार्ट प्रायव्हेट सेक्युरिटी एजेन्सी हि होताना दिसत आहेत. या वेळी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी झाली.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध आणि निर्णयात्मक खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या मालकांना सोबत घेऊन त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमाच्या मदतीने आणि संपूर्ण शहरात सर्वच सुरक्षा रक्षकांची दिवाळी संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे पी-४ च्या सर्वच सभासदांच्या रक्षकांना बोनस म्हणून प्रत्येकी ५०००/- रुपये तसेच सर्वांना मिठाई वाटप, मास्टर ब्लॅंकेट,एक पैठणी साडी, टी-शर्ट,जाकीट, पी-४ यांच्या वतीने देण्यात आली.

पी-४ च्या निर्मिती आणि नियोजनामुळे एक मोठे सुरक्षा अभियान चालू केले असून या वेळेस पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे (भापोसे), मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग (भापोसे) व सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी दिवाळी निम्मित शुभेच्छा दिल्या. सर्व पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिवाळी सणासाठी विशेष खबरदारी म्हणून पी-४ च्या पूर्व नियोजन बैठका हि घेण्यात आल्या.

अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे सर यांच्या वतीने दिवाळीच्या दरम्यान पुणे शहरात कायदा व सुव्यस्था राखण्यासंबंधी आणि सभोवतालच्या ठिकाणी गुन्हा घडू नये किंवा जर घडला त्या संबंधीचे विशेष सुरक्षा व्यवस्थापन व रक्षण,गस्त यांचे तसेच तपास,शोध प्रक्रिया व सुरक्षा उपकरणे हाताळणे संबधीचे पी-४ च्या सर्व खासदुत/पोलीस विशेष दूत यांना विशेष लक्ष देण्यावर भर दिला पाहिजे अशी सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी पी-४ ज्या हद्दीत काम करते त्या ठिकाणी एकही अनुचित प्रकार घडला नाही.

पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) व भारत शिल्ड फोर्स प्रा.ली चे संस्थापक सचिन मोरे यांच्या पुढाकारातून ग्रीन गेरा या हौसिंग सोसायटी मध्ये सदैव तन मन आणि सुरक्षा सेवा प्रति कर्तव्यावर राहणारे सुरक्षा पर्यवेक्षक (खासदूत) श्री.रामू कुमार यांनी सन २०१८ ते २०१९ या कालावधीमध्ये उल्लेखनीय कामकाज केल्या प्रकरणी श्री.रामू कुमार यांना ७५,०००/- किंमतीची एक्टिवा गाडी भेट देण्यात आली.सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी असेच काम करून एक आदर्श निर्माण करावा असेही भावना व्यक्त केल्या या दिवाळी निम्मित तमाम महाराष्ट्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मानाचा सॅल्यूट करून आपले कर्तव्य पार बदल्याबद्दल सर्वांचे आभारी मानले.