Home गुन्हा अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुटकाकरत अपहरणकर्त्यास केले अटक

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुटकाकरत अपहरणकर्त्यास केले अटक

0

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुटकाकरत अपहरणकर्त्यास केले अटक

विधानसभा 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्तात असताना.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाच्या गुन्ह्याची तक्रार दाखल होताच स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मांजरे व पोलीस कर्मचारी यांनी तपास सुरू केला.

📹 पोलीस आयुक्त पुणे शहर के.वेंकटेशम यांच्या संकल्पनेतील महत्वकांशी सी.वॉच प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरामध्ये गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मुलाला पळवून नेलेल्या घटनास्थळापासून पूर्ण पुणे शहराचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

👀 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता. वाकड येथील भुमकर चौकात अपहरण कर्त्या बरोबर मुलाचे सीसीटीव्ही फुटेज दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजचे छायाचित्र काढून या छायाचित्रांच्या आधारे मुलगा राहत असलेल्या ठिकाणी व घटनास्थळी चौकशी केली असता. अपहरण कर्ता हा पेंटिंगची कामे करत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर माहिती घेत त्याच्याकडून अपहरणकर्त्यांच्या मोबाईल नंबर मिळाला. मोबाईल नंबरचे लोकेशन चेक केले असता ते कोंढवे-धावडे उत्तम नगर याठिकाणी दिसून आले. कोंढवा पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली.

अपहरण कर्ता देवानंद भाऊसाहेब सरोदे (वय 37) यास कोंढवा पोलिसांनी अटक केली.

सदरची कामगिरी,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मांजरे, पोलीस शिपाई दाभाडे, पोलीस नाईक सुशील धिवार यांनी केली.