Home बातम्या महत्वाच्या बातम्या सांगलीतील जतमध्ये डेंग्यूने दोघांचा मृत्यू, तर चौघांना डेंग्यूची लागण

सांगलीतील जतमध्ये डेंग्यूने दोघांचा मृत्यू, तर चौघांना डेंग्यूची लागण

0

सांगली : डेंग्यूच्या साथीने सांगलीच्या जतमध्ये थैमान घातला आहे. डेंग्यूमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये एक युवक व चिमुरडीचा समावेश आहे. तर 4 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातला आहे. गेल्या 2 दिवसात शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सागर शिवसरण, वय 27 व कल्याणी पाटील,वय 6 असे मृतांची नावे आहेत.त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना पेशी कमी होऊन, प्रकृती खलवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जत शहरातील अन्य चौघांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर डेंग्यूच्या साथीमुळे जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या बाबतीत नागरिकांना आपल्या परिसरात स्वच्छता राखावी तसेच पाणी साठवून ठेवू नये. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.