Home गुन्हा एक लाख 53 हजार रूपयाचे दागिने अज्ञात चोरट्यांकडुन लंपास.

एक लाख 53 हजार रूपयाचे दागिने अज्ञात चोरट्यांकडुन लंपास.

0

पुणे : परवेज शेख अज्ञात चोरट्याने २३ ऑक्टोबर रात्री ९ ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ या वेळात निगडी पोलिस स्टेशन हद्दीत घरचा कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरले आहेत. सदर घटना केअर ऑफ आनंद साळुंके यांचे खोलीत, आनंद निवास, विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे पाठीमागे, क्रांतीनगर आकुर्डी या फिर्यादी सुरेश चव्हाण (वय ५०. रा. आकुर्डी) यांच्या घरात घडली.


माहितीनुसार, चव्हाण यांच्या रहात्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटून आतले ५१.०५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे १,५३,०००/- रूपयाचे दागिने कोणातरी अज्ञात चोरट्याने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता चोरले.

पुढील तपास निगडी पोलिस स्टेशनचे फौजदार भोये करत आहेत.