Home गुन्हा आई आजारी आहे सांगत चार नराधमांचा साध्वीवर बलात्कार

आई आजारी आहे सांगत चार नराधमांचा साध्वीवर बलात्कार

0

परवेज शेख आई आजारी आहे सांगत चार नराधमांचा साध्वीवर बलात्कार पटणा – आई आजारी असल्याचा बाहाना करत एका साध्वीवर सामुहिक अत्याचार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील शेखपुरा येथील ही घटना आहे. अरियरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलचोड गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित साध्वी ही आरोपींच्या गावातील रहिवासी आहे. रविवारी हे आरोपी साध्वी राहत असलेल्या आश्रमात आले. दरम्यान तिच्या आईची प्रकृती खराब असल्याचे सांगून सोबत चालण्यास सांगितले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून पीडिता त्यांच्याच सोबत गाडीमध्ये बसली. दरम्यान आर्ध्या रस्त्यास निर्जन ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, साध्वीवर सामुहिक बलात्कार करणारे चार आरोपींपैकी दोघे जण उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका गावात राहणारे आहेत. पिडित साध्वी याच गावची राहणारी आहे. नवादा जिल्ह्यातील पर्यटक स्थळ ककोलत येथील आश्रमात आपल्या सहकाऱ्यांसमवेत राहते.