Home पोलीस घडामोडी वडुजच्या रेल्वे पोलीसाच्या प्रामाणिक पणा बद्दल सर्वत्र होतंय अभिनंदन

वडुजच्या रेल्वे पोलीसाच्या प्रामाणिक पणा बद्दल सर्वत्र होतंय अभिनंदन

0

सातारा- (डॉ विनोद खाडे)
मुंबई,अंधेरी रेल्वे पोलीस फोर्स (RPF) येथील MSF जवान अतुल संजय जाधव मु.पो. वडूज, तालुका-खटाव, जिल्हा-सातारा यांना रेल्वे स्टेशन प्लेटफॉर्मवर्ती एक अनोळखी बॅग सापडली. अतुल यांनी ती बॅग RPF ऑफिसमध्ये आणून ठेवली.काही वेळाने अब्दुल नावाचा एक इसम बॅग हरवली असल्याचे सांगत चौकशी करिता आला असता ,त्याची ओळख पटवून त्यास त्याची बॅग परत करण्यात आली.सदर बॅगमध्ये
1) ४०,०००/- किमतीचा लॅपटॉप
२) २८,०००/- किमतीचा मोबाईल
हा एकूण ६८०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल होता
अतुल जाधव यांच्या या प्रामाणिक कामगिरी बद्दल
रेल्वे पोलीस दल,मित्र परिवार यांचे कडून अभिनंदन होत आहे.