खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील तीन वर्षापासून फरारी असलेल्या अट्टल गुन्हेगार जेरबंद

- Advertisement -

पुणे : परवेज शेख मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री ३ वाजता नुरगंहम पठाण (वय ६०, कवठे यमाई, ता शिरूर, जि. पुणे) हे त्यांच्या पत्नीसह घरात झोपले असताना चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत येऊन नुरगंहम यांना धमकावून जयतुन यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम आदी ७३,५००/- रूपयाचा माल चोरून नेला होता.

त्याचवेळी भरत भोर यांच्या डेअरीत चोरीचा प्रयत्न केला होता. ऐन दिवाळीत सदर घटना घडल्याने गावात दहशत होती. याबाबत पोलिस अधिक्षक संदिप पाटिल यांनी गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना दिल्या होत्या. याबाबत गुन्हे अन्वेषणचे
पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत होते. कुठलाही
धागादोरा न ठेवता हा प्रकार केला होता. परंतु गुप्त बातमीदारांचे
जाळे तयार करून अहमदनगर व पुणे जिल्हा येथील रेकॉर्डवरील
आरोपींची माहिती घेत असताना त्यांना सदर आरोपी अहमदनगर
जिल्ह्यातील निघोज व वाळुज परिसरातील असल्याची माहिती
मिळाली. त्यावरून सापळा रचून खुन, खुनाचा प्रयत्न यातील
रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश उर्फ आवड्या सादीश काळे (वय
२४, रा. वाळुज पारगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली

असता त्याने त्याचा साथीदार परेश उर्फ पऱ्या काळे व इतर
साथीदारांसमवेत गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. अविनाश
काळेवर यापूर्वी श्रीगोंदा पोलिस स्टेशनात १ व पारनेरमध्ये २ गुन्हे
दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार उमाकांत कुंजीर, पोलिस नाईक राजू मोमिन, जनार्दन शेळके, विजय कांवन, शिपाई अक्षय जावळे, धिरज जाधव, महेश आव्हाड, शिवाजी कावडे यांनी केली आहे.

- Advertisement -