Home गुन्हा जुन्या वादातून सख्ख्या भावाने केला खून, त्यानंतर मृतदेह गवतात लपवून ठेवण्यात आला.

जुन्या वादातून सख्ख्या भावाने केला खून, त्यानंतर मृतदेह गवतात लपवून ठेवण्यात आला.

0

परवेज शेख : जुन्या वादातून सख्ख्या भावाने केला खून, त्यानंतर मृतदेह गवतात लपवून ठेवण्यात आला.अहमदनगर : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलापूर येथील रहिवाशी असलेले सध्या भोकर येथे राहत असलेले युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात गवतात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. शिंदे, पो का .पवार, बर्डे, लोंढे, दिघे आदींनी घटनास्थळी जाऊन भेट दिली.प्राथमिक पोलिसांनी त्याला तात्काळताब्यात घेऊन अधिक तपास केला असता पोलिसांचा संशय खरा ठरला.

मयत प्रदीप याची पत्नी भाऊबीजेला माहेरी गेली होती. याबाबत प्रदीप याची पत्नी स्वाती प्रदीप नवले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्वाती नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी भाऊबीजेला माहेरी आलो होतो. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दीर रविंद्र याने आपले पती प्रदीप यांचेशी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातले. वादातून काहीतरी जड वस्तू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यात पती प्रदीप यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह घरासमोरून ओढत नेऊन गवतात लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपी रवींद्र बाबासाहेब नवले यास ताब्यात घेतले.