Home ताज्या बातम्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची केली पाहणी

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची केली पाहणी

0

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी वाङी,काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व इतर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करण्यात येवून मदतीबाबत आश्वस्त केले आणि त्याप्रमाणे संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांना आदेश दिले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील दंडेवाडी येथे अतिवृष्टीमुळे बाधित
सोयाबीन,बाजरी, कांदा पिकांची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व इतर अधिकारी उपस्थित होते.