पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ : शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती व प्रोत्साहनाचा नवा आराखडा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ : शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती व प्रोत्साहनाचा नवा आराखडा
- Advertisement -


सोलापूर, दिनांक २:- नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” जाहीर करण्यात आली. योजनेचा उद्देश थकबाकीदारांना कर्जमुक्त करणे व नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेतून राज्यातील 56 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटीची कर्जमुक्ती मिळणार आहे.

कर्जमुक्तीचे निकष

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या कर्जावर प्रति शेतकरी 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळेल. महात्मा फुले योजनेच्या लाभार्थींना 50 हजारांपर्यंत लाभ मिळणार. 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर 2 लाखांचा लाभ मिळेल. NPA खात्यांसाठी बँकांशी वाटाघाटी करून सुट निश्चित होईल.

प्रोत्साहनपर लाभ

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24, 2024-25 पैकी कोणत्याही दोन वर्षांत वेळेत परतफेड केल्यास 50 हजारांपर्यंत लाभ मिळेल. कर्ज रक्कम कमी असल्यास परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5 हजार, यापैकी जास्त रक्कम लाभ म्हणून मिळेल.

अपात्र कोण?

मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25,000 पेक्षा जास्त वेतन/पेन्शन असलेले शासकीय अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे, सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी व 25,000 पेक्षा जास्त वेतन असलेले सहकारी संस्थांचे पदाधिकारी अपात्र ठरतील.

अंमलबजावणी

योजना पूर्णपणे ऑनलाईन राबवली जाणार असून आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करून अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले जाईल.

ही योजना थकबाकीदारांना थेट दिलासा, नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन व बँकिंग यंत्रणेला बळ देईल. पारदर्शक अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत होईल.

******

जिल्हा माहिती कार्यालय,



Source link

- Advertisement -