महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप
- Advertisement -


पुणे, दि. १३ : आषाढी वारीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या वतीने जेजुरी येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून हा सेवा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सचिव दत्तूजी समरीतकर तसेच संस्थानाचे विश्वस्त व मुख्य पुजारी केशवरावजी फुलझेले उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत, वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.

00000

 

 

 



Source link

- Advertisement -