Home गुन्हा कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0

लातूरमधील शिरूरअनंतपाळ तालुक्य़ातील तरूण शेतकरी मारोती रावसाहेब बिरादार-पाटील (वय 30) यांनी शुक्रवारी (ता. 1 ) दुपारी शेतामधील विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केली. मारोती यांच्यावर आयसीसीआय बँकेचे सहा लाख सत्तर हजार रुपये व विविध कार्यकारी सोसायटीचे एक लाख रुपये कर्ज असून, सततची नापीकी व दुष्काळ असल्यामुळे कर्ज कसे फेडावे याच विंवचेनेमध्ये त्यांनी विहीरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. थकीत कर्जामुळे आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताचे नातेवाईक डिगोळ येथील पोलीस पाटील आण्णाराव पंडितराव पाटील यांनी शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

मारोती रावसाहेब पाटील यांच्या पश्चात वयोवृध्द आईवडील पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. बहिणीच्या लग्नासाठी व शेतीसाठी त्यांनी गावातील सोसायटी आणि बँकेतून आठ लाखाचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर वेळोवेळी खासगी सावकाराकडून कर्ज घेतल्याने बँकेतील कर्जासह सावकारी कर्जाचाही बोजा वाढला होता. थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांकडून तगादा सुरू होता, यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. शुक्रवारी दुपारी शेतातील विहीरीत उडी टाकुन आत्महत्या केली.

नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. बिरादार पाटील यांच्या नातेवाईकांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.