बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे

बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे
- Advertisement -


मुंबई, दि. २० : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाख रूपयापर्यंतची विनानिविदा कामे बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामवाटप समितीमार्फत वितरित करण्यात येतात. २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्राप्त होणाऱ्या कामांच्या वाटपासाठी मुंबई शहर जिल्ह्यात कार्यरत व नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इच्छुक संस्थांनी संस्थेच्या लेटरहेडवर प्रस्तावासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्व सभासदांची अद्ययावत यादी, २०२३-२४ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडून ३१ जुलै, २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर येथे प्रस्ताव सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 



Source link

- Advertisement -