सांगली, दि. १३: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिनांक 14 व 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता एसके इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरेधरण (एमएच), ता. वाळवा येथे आगमन व कॅडेट मेसच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी १०.४० वाजता रेठरेधरण, ता. वाळवा येथून वाहनाने मिरज, जि. सांगलीकडे प्रयाण.
सकाळी ११.४५ वाजता डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, झारी बाग, मिरज येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत निधीतून बांधण्यात आलेल्या जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली यांच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती.दुपारी १ वाजता हॉटेल ककुन, आमराई रोड, सांगली येथे आगमन व “लोकमत एक्सलन्स अवॉर्ड” सोहळ्यास उपस्थिती. दुपारी २.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी २.४५ वाजता वाहनाने जतकडे प्रयाण.
दुपारी ४ वाजता गट क्र. १९, शासकीय गोदामाजवळ, निगडी रोड, जत येथे आगमन व पुढील कार्यक्रमांस उपस्थिती :
- स्वयंचलित वाहन प्रशिक्षण केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जत यांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती.
- उमराणी रोड, जत येथे नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजना व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) नगरोत्थान निधी अंतर्गत ‘नमो विद्यान’ विकसित करणे व ग्रंथालय बांधकाम करणे या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.
- जत-सांगली रोड, जत येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण.
- जत-सांगली रोड, नगरपरिषद पाण्याच्या टाकीजवळ, जत येथे नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत जत नगरपरिषद, जत यांच्या इमारत बांधकाम कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.
सायंकाळी ६ वाजता जत येथून वाहनाने सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी ७.१५ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील आयलँड लोकार्पण व ध्वजस्तंभ शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
रात्री ८ वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण.
सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे आगमन व भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभास उपस्थिती.
००००









WhatsApp