Home ताज्या बातम्या जगभ्रमंतीवर निघालेले दुसऱ्या महायुद्धातील स्पीट फायर विमान पोहचले नागपुरात

जगभ्रमंतीवर निघालेले दुसऱ्या महायुद्धातील स्पीट फायर विमान पोहचले नागपुरात

0

नागपूर : जगभ्रमंतीवर निघालेले द्वितीय विश्व युद्धातील ऐतिहासिक असे स्पिट फायर विमान 4 नोव्हेंबरला नागपूरात पोहचले. द्वितीय विश्व युद्धात सिल्वर स्पिटफायर विमानांनी अनेक महत्वपूर्ण कामगिरी केली होती. एक इंजिन असलेलं हे विमान कालांतराने सेवेतून बाद झाले. आता तब्बल 62 वर्षानंतर इंग्लंडचे वैमानिक स्टीव्ह बुक व जेम्स पॅट यांनी विंटेंज महत्व प्राप्त झालेल्या या विमानातून ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधून जगभ्रमंतीला सुरवात केली आहे.

दुसऱ्या महायुद्धात हे विमान उडवनाऱ्या सर्वच देशात जाऊन विमान त्या देशात उतरवण्याचा या वैमानिकांचा प्रयत्न आहे. या दरम्यान 29 देशातून 27 हजार मैलाचा प्रवास करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबर ला कोलकाता मधून या विमानाने भारतीय वायू क्षेत्रात प्रवेश केला तेथून नागपूरच्या सोनेगाव वायू स्टेशन वर हे विमान उतरले. यावेळी स्पिट फायर विमानाच्या वैमानिकांचे स्वागत सोनेगाव वायू स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन एस के तिवारी यांनी करत दोन्ही वैमानिकांना शुभेच्छा दिल्या.