Home गुन्हा १२ वर्षापासुन घरफोडी चोरी करणार्‍या फरार आरोपी जेरबंद

१२ वर्षापासुन घरफोडी चोरी करणार्‍या फरार आरोपी जेरबंद

0

१२ वर्षापासुन घरफोडी चोरी करून पाहिजे असलेला आरोपी जेरबंद

पुणे : परवेज शेख २२/०७/२००७ रोजी सायंकाळी ०५/०० वा. ते २३/०७/२००७ रोजी सकाळी ७/०० वा चे सुमारास अमिन अब्बास बागवान वय २८ रा.शितल पेट्रोल पंपा समोर कोंढवा पुणे हे घराला कुलुप लावुन घर बंद असताना कोणतरी अज्ञात चोरटयाने ड्युप्लिकेट चाविने सेफ्टी डोअरचे कुलुप उघडुन आत प्रवेश करुन १८.५००/- रुपये किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने चोरुन नेले तसेच शेजारील प्रगती पार्क सोसायटी येथील उस्मान यांचे घराचे दरवाजाचे कुलुप तोडून घड्याळी कॅमेरे व रोख रक्कम २५,०००/- असा एकुण ४३,५००/- रुपये चा माल घरफोडी चोरी करुन नेले बाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ३३९/२००७ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्हयांत अटक करण्यात आले होते सदर गुन्ह्यात रियाज रज्जाक मरुळ, रा. अंबिकानगर, बिबवेवाडी, पुणे हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे १२ वर्षापासुन फरार होता.

दि. ०६/११/२०१९ रोजी युनिट -१, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी युनिट-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांतील १२ वर्षापासुन फरारी असलेला आरोपी रियाज मरुळ हा सोमाटणे फाटा येथील शिवाजी चौक येथे हमाली काम करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्या बाबत वरिष्ठांना माहिती देवुन परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमी प्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रियाज रज्जाक मरुळ, रा. अंबिकानगर, बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे वानवडी पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुशंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने सांगितले की, मी व इतर साथिदार असे आम्ही शितल पेट्रोल पंपासमोरील सोसायटीत घराच कुलुप तोडुन चोरी करुन सोन्या चांदिचे दागिने तसेच शेजारील घर फोडुन त्या घरातील घड्याळे व कॅमेरे चोरुन घेवुन गेलो होतो. त्यावेळी मी सुध्दा त्यांचे बरोबर होतो व सदर गुन्हा दाखल झाले पासुन वेगवेगळी घरे बदलुन सुमारे १२ वर्षापासून मी फरार आहे. असे कबुली दिली.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयक्त, गुन्हे, श्री बच्चन सिंह, यांचे मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी योगेश जगताप, अमोल पवार, वैभव स्वामी. अजय थोरात, बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे यांनी केली आहे.