Home गुन्हा थेऊरफाटा येथे खुणासह जबरी चोरी गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद

थेऊरफाटा येथे खुणासह जबरी चोरी गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद

0

पुणे : परवेज शेख गणेश महादेव ताम्हाणे यांचे घरावर दरोडा टाकून घरामध्ये झोपलेले गणेश ताम्हाणे वय ४५ वर्षे व त्यांची पत्नी वर्षा ताम्हाणे वय ४० वर्षे यांचे डोक्यात,तोंडावर घातक हत्यारांनी जबर मारहाण करुन त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेलेबाबत अज्ञात चोरटयांविरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . गुन्हा दाखल झालेनंतर दोघेही गंभीर जखमी पती – पत्नी हे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना दि.३० रोजी यातील जखमी वर्षा गणेश ताम्हाणे वय ४० या मयत झालायने गुन्हयाचे गांभिर्य आणखीनच वाढलेले होते. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते .

त्यानुसार स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पोलीस हवालदार महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , गुरु गायकवाड , सुभाष राऊत , अक्षय जावळे यांचे पथक नेमलेले होते . सदर पथकाने गुन्हयाचा कसून तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अहमदनगर जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मंगेश उर्फ सुनिल बिटक्या काळे रा . वांगदरी ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर , दिलीप उर्फ टिल्या उर्फ राजा द-या भोसले वय २५ वर्षे रा . लिंपणगाव ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर व त्याचे दोघे साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळाली होती . सदर पथक हे आरोपींचा शोध घेत असताना त्यातील एक आरोपी मंगेश उर्फ सुनिल बिटक्या काळे यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आलेले आहे . गुन्हयातील पाहिजे असलेल्या इतर आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास पाहिजे असलेला आरोपी दिलीप उर्फ टिल्या उर्फ राजा द-या भोसले हा दौंड येथे येणार असल्याची माहिती मिळालेवरुन सदर पथकाने वेशांतर करुन व सापळा रचून सदर आरोपीस दौंड – काष्टी रोड येथून पाठलाग करुन ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विवेक पाटील ,जयंत मीणा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा .पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम,सचिन गायकवाड,गुरु गायकवाड,सुभाष राऊत,अक्षय जावळे यांचे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.