Home गुन्हा बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चार आरोपी जेरबंद

बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चार आरोपी जेरबंद

0

पुणे : परवेज शेख बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चार आरोपी जेरबंद खोपोली पोलीसांची धडक कारवाई 04 आरोपींना केले जेरबंदमा.श्री.अनिल पारस्कर सो. पोलीस अधीक्षक, रायगड यांनी ईद-ए-मिलादचे पार्श्वभूमीवर अवैध धंदे व गुन्हेगार, यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पारित केले होते. त्याअनुषंगाने खोपोली पोलीस ठाणेच्या हद्दीत वेळोवेळी नाकाबंदी, कोंबिग ऑपरेशन करीत असताना दिनांक 05.11.2019 रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.श्रीरसागर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एका हुंडाई कारमधून 04 ते 05 इसम अवैधरित्या गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.श्रीरसागर यांनी तात्काळ विशेष पोलीस पथक तयार करून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील रॉकेल पॉइंट येथे पुणेकडे जाणारे सर्व वाहनांची तपासणी करीत असताना एक हुंडाई कार मध्ये 04 इसमाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने ती कार थांबऊन त्यांच्या गाडीची झडती व गाडीतील इसमांची अंगझडती घेतली असता गाडीमध्ये 1) अबदान मुअज्जम अन्सारी, रा.शांतीनगर भिवंडी, जि.ठाणे, 2) फिरोज इमामुद्दीन शेख, रा. शांतीनगर, भिवंडी जि.ठाणे, 3) परवेझ जुबेर अन्सारी रा.शांतीनगर, भिवंडी जि.ठाणे, 4) जाहीद जावेद खान, रा.शिवाजी चौक, भिवंडी जि.ठाणे असे इसम मिळुन आले. त्यानंतर पोलीस पथकाने नमुद कारची पुर्ण पाहणी करून वरील नमुद इसमांची झडती घेतली असता अबदान मुअज्जम अन्सारी याचे कमरेला लावलेले गावठी बनावटीची पिस्टल व त्याचे पॅन्टचे उजवे खिशात एक जिवंत राउंड, एक फायटर व इतर साहीत्य असे मिळुन आल्याने त्यांना तुम्ही कोठे जात असलेबाबत विचारणा केली असता त्यांनी मुंब्रा कौसा, जि.ठाणे येथुन खोपोली येथे आल्याचे सांगीतले. त्यानंतर जप्त मुद्देमाल व आरोपीत यांना पोलीस ठाण्यात घेवुन येवुन सदर घटनेच्या अनुशंगाने खात्री व पडताळणी करून खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 214/2019, भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अटक आरोपीयांना न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना दिनांक 08/11/2019 पर्यत पोलीस कस्टडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.अमोल वळसंग खोपोली पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.श्री.अनिल पारस्कर,पोलीस अधिक्षक रायगड यांच्या आदेशान्वये व मा.श्री.सचिन गुंजाळ, अपर पोलीस अधिक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली, मा.श्री.डॉ.रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर यांच्या सूचनांप्रमाणे श्री.अमोल वळसंग पोलीस उपनिरीक्षक, श्री.जावेद मुल्ला, परि. पोलीस उपनिरीक्षक, पाटील, गोर, कुंभार, चौव्हाण खरात, तांबोळी या पथकाने यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.