सातारा : (डॉ विनोद खाडे) वडूज शहरात बेशिस्त वाहतुक,29 वाहनांवर कारवाई -दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या,
वाढणारे अपघात, वाहतुकीची कोंडी, सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास या गोष्टी लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज शहरात पार्किंग व्यतिरिक्त इतर ठिकाणी लावलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वडुज शहरातील बेशिस्त वाहतुकीस आळा बसावा, याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शना
खाली पोलिस निरिक्षक अशोक पाटील, वडुज पोलीस ठाणे यांचेसह वडुज पोलीस ठाणे यांचेकडील वाहतुक
शाखेचे कर्मचारी, वडुज पोलीस ठाणे यांचेकडील कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी
कार्यालयातील कर्मचारी तसेच होमगार्ड अशा एकुण ४० कर्मचारी यांचेसह वाहतुकीची विशेष
मोहिम राबविण्यात आली.यामध्ये वडुज शहरातील वाहतुक,पार्किग तसेच अस्ताव्यस्त उभ्या असणाऱ्या
दुचाकी, चारचाकी गाड्या चालकांवर शिस्त लागावी याकरीता एकुण २९ वाहनांवर कारवाई करण्यात आली
असून काही वाहन धारकाकडुन रितसर दंडात्मक रक्कम वसुल करणेत आली तर काही वाहनांवर खटला तयार
करुन मा.कोर्टात पाठविण्यात येणार आहेत.या मोहिमेत एकूण २५ वाहनांकडुन ५०००/-
रुपये दंड वसुल करण्यात आला असुन ४ वाहनांवर भारतीय दंडविधान कलम २८३ अन्वये कारवाई करण्यात
आली .तसेच काही दिवसांपूर्वी परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंग, चोऱ्या आदी गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपी कडून हस्तगत केलेला मुद्देमाल, सोन्याचे दागिने, मोबाईल आदी वस्तू पीडितांना डी वाय एस पी महामुनी यांचे हस्ते परत करण्यात आला.