Home गुन्हा नालासोपारा पोलीस ठाणेकडुन १ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे बाळगणा-या आरोपीतांस अटक

नालासोपारा पोलीस ठाणेकडुन १ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे बाळगणा-या आरोपीतांस अटक

0

परवेज शेख नालासोपारा पोलीस ठाणेकडुन १ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे बाळगणा-या आरोपीतांस अटक

मुंबई : शफीक शेख पालघर जिल्हयात दिनांक ०६/११/२०१८ रोजी २२.४० वा. चे सुमारास नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत सिवीक सेंन्टर ते इंद्रप्रस्थ बिल्डींगकडे चंद्रेश पॅलेस बिल्डींग समोर रोडवर नालासोपारा पश्चिम ता.वसई जि.पालघर येथे आरोपीत नामे कैलाससिंग भगवतसिंग राजपुत वय ४१ वर्षे धंदा- बिल्डींग कंन्स्ट्रक्शन रा. नालासोपारा प. यांचे ताब्यातुन १) ४०,०००/- रुपये किंमतीचे एक पिस्टल. २) २,१००/- रु किंमतीचे सात जिवंत काडतुसे ३) १०,०००/- रु किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकुण ५२,१००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीत यांचे विरुध्द नालासोपारा पोलीस ठाणे गु.र.न. [ ३८६/२०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. लब्दे नालासोपारा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी/माने, पोहवा/पग्धारे, पोना/धनु, मपोशि/मंगेरी नालासोपारा पोलीस ठाणे यांनी केली आहे.