Home ताज्या बातम्या वडूज एस टी आगाराच्या अनेक बसेस धोकादायक,चांगल्या गाड्यांची मागणी

वडूज एस टी आगाराच्या अनेक बसेस धोकादायक,चांगल्या गाड्यांची मागणी

0

सातारा : (डॉ विनोद खाडे)
-महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या ब्रीद वाक्या नुसार “एस टी चा प्रवास,सुखाचा प्रवास’ आजच्या प्रवाशांना खरंच सुखाचा वाटतो का?सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज आगार च्या बसेस ची दुरवस्था पहा बातमी सविस्तर


एसटी महामंडळ कायम तोट्यात आहे,असं वारंवार मंडळाकडून बोललं जातं, मात्र प्रवाशांना
जर सुविधा मिळत नसतील तर काय करणार?आणि यामध्ये जर एसटी बसेस ची दुरवस्था असेल आणि रस्ते ही असेंच असतील तर प्रवासी कसे प्रवास करणार.काही वर्षांपूर्वी सतत महाराष्ट्रात उत्पन्न
व नियोजनाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या वडूज आगाराला घरघर लागली आहे. याचं एक उदाहरण म्हणजे
औंध हुन वडूज ला येणाऱ्या एसटी बसेस चा ड्रायव्हर च्या बाजूचा दरवाजा चालू गाडी असताना तुटून खाली रस्त्यावर पडला.यावेळी सुदैवाने कोणते दुसरे वाहन, किंवा
दुचाकी, पादचारी शेजारून गेले नाही, अन्यथा सुमारे 15 किलो वजनाचा दरवाजा कुणाच्या अंगावर पडला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता? चांगल्या कंडिशन च्या बसेस या आगाराला कधी मिळणार, अन्यथा जनता रस्त्यावर उतरणार हे मात्र नक्की.