Home गुन्हा चिखली शहर बनले वरली मटक्याचा अड्डा

चिखली शहर बनले वरली मटक्याचा अड्डा

0

चिखली / बुलढाणा : सतिश पैठणे

जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली शहराला हळू हळू कुख्यात शहराचे नाव येण्यास सुरुवात झालेली आहे जिल्हाभरात किंवा राज्यभरात सुरू असलेली गुटखाबंदी आमच्या गुटखाबंदी चे चिखली शहरात असलेले पाळेमुळे आता वरली-मटक्याचा रूपाने पहावयास मिळत आहे चिखली शहरात राजरोस महात्मा फुले मार्केट येथे देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला बस स्टँडच्या बाजूला चोरीछुपे या मार्गाने वरळीच्या धंद्याचे प्रस्थ आहे आणि

पोलीस प्रशासन मात्र याकडे मूग गिळून बघत आहे एखाद्या वेळेस मनात अशी शंका येते की पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नसेल लाखोचा गुटखा पकडून गुटका किंग मोकाट का होत असलेली वर्षानुवर्षे कारवाई होते आणि पाणी मुरते कुठे प्रशासनाने जर वेळीच चपराक दिली नाही तर हजारो युवक तरुण या व्यसनाच्या आहारी जाऊन युवापिढीचा वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही राजकारण म्हटलं की युवा आला युवा आला कि जोश आला आणि जोशात दारू तंबाखू धाब्यावर जेवणे आणि वरली मटका लावणे यात काही गैर नाही असाच प्रकार व या प्रकाराला खतपाणी घालण्याचे काम चिखली शहरात होत आहे एकूण 100 खेड्यांनी बनलेला चिखली तालुका आणि त्याच्या जवळ असलेला दांडगा जनसंपर्क याचा गैरफायदा घेऊन काही कुख्यात मंडळी चिखली शहरात पोलिसांची साफ घेऊन वरली मटका जोमात चालवत आहेत कधीकधी अशी शंका येते की पोलीस प्रशासनाला तिकडे यायला वेळ नाही का जर असेल तर मग हा धंदा एवढा राजरोस चालतो कसा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित गैर प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन बंद करण्याची गरज आहे अन्यथा युवा हा बेरोजगार तर आहेत पण व्यसनाधीन झाल्यावर त्याचे कुटुंब उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रयत्न करून वरला मटका वरली मटका सारखे जुगार शहरातून तात्काळ हद्दपार करावे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे