Home अश्रेणीबद्ध मावळ – संस्थांच्या व कंपनीच्या नावे बोगस वेबसाईट बनवून ग्राहकांची होत आहे फसवणूक

मावळ – संस्थांच्या व कंपनीच्या नावे बोगस वेबसाईट बनवून ग्राहकांची होत आहे फसवणूक

0

नामांकित कंपनी सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करून ग्राहकांची ऑनलाईन फसवनूक करणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे.  आपली फसवणूक होऊ नये.याकरीता आँनलाईन व्यवहार करताना त्यामधील गोपनीय माहिती, ओटीपी नंबर, कार्डचा सिव्हिव्ही नंबर, क्युआर कोड कोणालाही देऊ नये. तसेच फसवे फोनकाॅल व आँफरच्या फंदात पडून फसगत करुन घेऊ नका असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या अनोळखी सायबर टोळीच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.लोणावळा- खंडाळा शहर हे थंड हवेचे शहर म्हणून व पर्यटन स्थळ म्हणून ओळख असून या ठिकाणी अनेक पर्यटन येत असतात  अनेक नामांकित कंपनी संस्था तसेच हाॅटेल व रेस्टाॅरंट आहेत. या संस्थाच्या नावलौकिकाचा फायदा घेत काही सायबर क्षेत्रातील गुन्हेगारानी या संस्था व अस्थापनाच्या नावे फेक वेबसाईट बनवतात, त्यामध्ये बुकिंग करण्याच्या नावाखाली लिंकच्या माध्यमातून आपल्या खात्याची माहिती मिळवत तसेच शब्दांचा खेळ करत बँकेचा रिमोट एक्सेस घेत ऑनलाईन फसवणूक करत आहेत. असे प्रकार अनेक ग्राहकांच्या सोबत घडले आहेत. कोणती बँक आपल्या ग्राहकाकडे कोणत्या प्रकारचा ओटीबी टीएम कोड मागत नाही असे कॉल आल्यावर ते बोगस आहे तो कॉल रिसिव्ह न करता कट करावा.क्ष आपली ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचा पासवर्ड कोणाला सांगू नका असे आव्हान लोणावळा शहर पोलिसांनी नागरिकांना केले