चार वर्षाची मुलगी हरवली असता सदर पोलिसांच्या कामगिरी मुळे पालकांना पुन्हा मिळाली

- Advertisement -

परवेज शेख चार वर्षाची मुलगी हरवली असता सदर पोलिसांच्या कामगिरी मुळे पालकांना पुन्हा मिळाली.कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सत्यानंद हॉस्पिटल जवळ एक चार वर्षाची मुलगी खूप जोरात रडताना आढळून आली. सदर मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता ती मम्मी-पप्पा म्हणून जोरात रडत होती.मम्मी पप्पा मम्मी पप्पा करत होती.तिकडचे रहिवाशी मोईन सय्यद आणि इमरान शेख यांना मिळाली.

त्या दोघांनी तिला सोबत घेऊन कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणून दिले सदर पोलिसांची कामगिरी त्या मुलीला गाडीवर बसवून कोंढवा मध्ये नागरिकांचे ओळख पटवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांनी जिथे विचारपूस करत होते.तिथेच त्या मुलीचे आई-वडील त्यांना भेटले  असता त्या मुलीचे आई-वडील यांची खात्री करून घेऊन त्या मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले .सदरची कामगिरी एपीआय पवार पोलीस शि. रमीज मुल्ला , पोर्णिमा वाडकर , सुनिता कांबळे यांनी ही कामगिरी केली.

- Advertisement -