Home शहरे अहमदनगर नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्याची दुरअवस्था

नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्याची दुरअवस्था

0

‌नेवासा : नेवासा फाटा ते हिवरा, सौंदाळा,भेंडा,कुकाणा,मार्ग शेवगाव कडे जाताना संपूर्ण रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बाबत,निवदने करून ही महत्त्वाच्याया महामार्गाकडे संबंधित आधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रवावी वर्गातून बोलले जात आहे.तालुक्याचे ठिकाण हे असल्याने भेंडा,कुकाणा,शेवगाव या महत्त्वाच्या गावातील नागरिक महत्त्वाच्या महामार्गवरून प्रवास करीत आहेत. राञीच्या वेळी प्रवास करताना वाहन चालकाना व प्रवाशांना अंगावर शहारे उभे राहतात.अनेक वेळा राञीच्या वेळी खड्डा अंदाज न असल्यामुळे अनेक वाहन चालकाना गंभीर अपघाताना सामोरे जावे लागले आहे. मोटरसाइकिल स्वार यांना गंभीर दु:खात होऊन अपंग झाले असून दळणवळणाच्या दुष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.हिवरा,भेडा, कुकाणा,शेवगाव हि बाजर पेठ असल्याने बाजाराच्या दिवशी व्यापारी व बाजार करून इत्यादी सकाळी सात वाजल्यापासून ये-जा होताना दिसते. या धावपळीच्या जीवन सैली मध्ये छोटे मोठे अनेक अपघात हे समोर समोर घडले जातात. तसेच नेवासा,शेवगाव चा बाजार दिवस आठवडा बाजार भरतो त्या दिवशी देखील प्रवाशांची मोठी व आदळ आपट होते.रस्त्याची साईड पुष्टी ही अत्यंत खरांब झालेली आहे.ऐक ते दोन फूट खडे झालेले आहे.त्यामुळे टुव्हीलर यांना अपघात होतात.या रस्त्याची न दुरवस्थी मुळे अपघाताना बळी पडतात. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाना अनेक वेळा निदर्शनास आणून दिले असून देखील संबंधित आधिरारी दुरूस्तीच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.