Home ताज्या बातम्या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागरिक अधिकार मंचच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली

0

11 नोव्हेंबर 2019 सोमवार

पुणे-परवेज शेख भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त कोंढवा खुर्द या ठिकाणी नागरिक अधिकार मंचच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये पुणे शहर कोंढवा खुर्द भागाचे जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेतला होता


या रॅलीमध्ये माउंट कार्मल हायस्कूल न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल मोलेदिना हायस्कूल पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल नोबल स्कूल,स्पॅम स्कूल, pmc-122, न्यू ग्रेस स्कूल,पी ए इनामदार स्कूल व असे अनेक उर्दू,मराठी,इंग्लिश शाळेतले 1200 विदयार्थी व शिक्षक वर्ग तसेच कौसर बाग हिलमिस्ट ग्रुप ,साईबा ग्रुप सामाजिक कार्यकर्ते मोठं संख्याने सहभागी होते या रॅलीचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले

या रॅलीची सुरुवात कोंढवा खुर्द येथील मोर मॉल समोर ते कोंढवा गावठाण ते ज्योती हॉटेल तसेच पुढे एन आयबीएम चौक ते पारगे नगर सिटी लॉन मंगल कार्यालय पर्यंत केले होते तसेच कौसर बाग मस्जिद डीपी रोडला स्थानिक नगरसेविका नंदा लोणकर यांच्या संकल्पनातून भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद रोड असे नाव देण्यात आले व उद्घाटन समारंभ आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

या रॅलीचे आयोजन नागरिक अधिकार मंचचे समीर शफी पठाण,निखिल रोकडे,तकदिर सय्यद,नईम शेख ,इरफान बागवान,अमीन खान,शानु शेख,नाझीम बेग, समीर शेख,रोनक धवळे, शुभम फासगे, विकास गायकवाड ,जावेद इनामदार,मुश्ताक शेख,यासिन शेख, अशरफ शेख,आदिल डबीर, आमीन शेख शरीफ शेख इमरान खान अजगर खान मनोज लांडगे इस्माईल हमधदूले,रियाझउद्दीन सर व सर्व कार्यकर्तेनि केला होता