Home गुन्हा घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल घरफोड्याना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली

घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल घरफोड्याना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली

0

पुणे: परवेज शेख पुणे गुन्हे शाखा युनिट-४ च्या पोलिसांनी पोलिस दलावरील सराईत गुन्हेगार व शहराबाहेर जाऊन घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल घरफोड्याना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली बातमीदार तर्फे बातमी मिळाली , पुणे पोलिस आयुक्त व अपर पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार युनिट-४ च्या पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्षद पवार व विशाल घोडके हे घणसोली, नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याची व ठाणे, नवी मुंबई, रायगड परीसरात घरफोडी करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मागोवा घेत असताना ते ९ नोव्हेंबर रोजी चंदननगर परिसरात त्यांच्या नातेवाईकाना भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विवेक शिसाळ व त्यांच्या पथकाने खराडी बायपास चौक, चंदननगर येथे त्याना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी मानपाडा पोलिस स्टेशन, नवी मुंबई हद्दीत ४, कामोठे पोलिस स्टेशन, नवी मुंबई येथे १, खोपोली पोलिस स्टेशन येथे १, तोफखाना पोलिस स्टेशन, अहमदनगर येथे १ व दिवा पोलिस स्टेशन, नवी मुंबई येथे १ असे एकूण ९ गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. खडकी पोलिस स्टेशन हद्दीत चोरलेले साडे तीन तोळे वजनाचे १,०५,०००/- रूपयाचे सोन्याचे दागिने, ६७४ ग्रॅम चांदीचे दागिने व २ मोटरसायकल असा एकूण २,४४,८००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त असून आरोपींची १६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कस्टडी आहे.

सदरची कामगिरी गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, संभाजी कदम, आर्थिक गुन्हेचे सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, ए एस आय अब्दुलकरीम सय्यद, भालचंद्र बोरकर, पोलीस कर्मचारी गणेश साळुंके, हनुमंत बोराटे, शितल शिंदे, सुरेंद्र साळवे, सचिन ढवळे, राकेश खुणवे, सुहास कदम यांनी केली आहे.