Home गुन्हा वाहन चोरी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या आरोपी जेरबंद

वाहन चोरी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या आरोपी जेरबंद

0

पुणे : परवेज शेख पिपरी- चिंचवड व पुणे शहर येथील गुन्हे उघडकीस आणून १० लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निगडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुध्ददेव बिष्णू बिश्वास (वय २१, रा. दत्तवाडी, आकुर्डी, मुळगाव बिध्दाशागरपल्ली, कोकोमण थाना, स्टील दुर्गापूर, जि.बौध्दमाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. थरमॅक्स चौक येथे आरोपी बुध्ददेव दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश मावसकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मावसकर याला थांबवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन मोबाइल फोन मिळून आले.

त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी केली. निगडी व परिसरातून दुचाकी चोरी केली असल्याचे त्याने सांगितले. निगडी, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहुरोड या भागातून १३ दुचाकी व एक मोबाइल चोरल्याचे त्याने सांगितले. १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपी बुध्ददेव याने निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी तसेच एक मोबाइल चोरल्याचे समोर आले आहे. त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे डेक्कन, हिंजवडी, सांगवी व देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही आरोपीने वाहनांची चोरी केली आहे. इतर चार दुचाकी तसेच एक मोबाइल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, तपास पथकातील शंकर बांगर, किशोर पढेर, सतीश ढोले, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, तुषार गेंगजे, भुपेंद्र चौधरी, अमोल साळुंखे, कोंडीभाऊ वाळकोळी, मितेश यादव, उद्धव खेडकर, गोदावरी बिराजदार व राजू जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.