Home गुन्हा रावण टोळीचा म्होरक्या चिम्या उर्फ अमोल गायकवाडला गावठी पिस्तूलसह अटक

रावण टोळीचा म्होरक्या चिम्या उर्फ अमोल गायकवाडला गावठी पिस्तूलसह अटक

0

देहूरोड : देहूरोडपोलिसांनी केलेल्या कारवाईत देहूरोड येथील चिंचोली गावाजवळ  ( देहूरोड)  कुख्यात गँगस्टर रावण टोळीचा म्होरक्या चिम्या उर्फ अमोल गायकवाड याला जुन्या गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे. 
        देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद निजप्पा गायकवाड यांची रावण टोळीने गेल्या चार ते पाच वर्षात रावेत,काळेवाडी, निगडी, आकुर्डी , वाकड आदी भागात जरब बसविली होती. मोक्का अंतर्गत केलेल्या  कार्यवाहीत विनोद गायकवाड व साथीदार यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर त्याचा भाऊ चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड ( रा. रावेत ता हवेली  ) याने भूमिगत होता. ससा उर्फ वाघमोडे , सोन्या जाधव, नझीम व इतर साथीदारांच्या साह्याने चालविण्याचा प्रयत्न करीत टोळी उभारण्याचे काम करीत होता . याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रीतम वाघ, राजेश कुरणे यांच्याकडून जमा   केली जात असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड येथील चिंचोली गावाजवळ अमोल गायकवाड या;ला तंभयत घेतले . यावेळी घेण्यात आलेल्या झडतीत  गायकवाडकडे एक जुने वापरते गावठी पिस्तूल मिळून आले. अमोल गायकवाड हा २०१७ पासून मोक्कामध्ये हवा ( वाँटेड ) होता. 
      पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहआयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्त पोळी आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त संजय नाईकपाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मनीष कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार , उपनिरीक्षक जगताप , गायकवाड, पोलीस हवालदार शाम शिंदे, प्रीतम वाघ , राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांनी कारवाई केली.