Home गुन्हा युनिट १ गुन्हे शाखा ने अग्निशस्त्र बाळगणारा आरोपीस जेरबंद केले

युनिट १ गुन्हे शाखा ने अग्निशस्त्र बाळगणारा आरोपीस जेरबंद केले

0

पुणे : परवेज शेख मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सचिन जाधव व पोलीस नाईक इम्रान शेख यांना बातमीदारा मार्फत पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी नामे उमेश रमेश कोकाटे वय ३४ वर्षे रा.पोकळे वस्ती, बिबवेवाडी, पुणे याचे कडे बेकायदेशीर अग्निशस्त्र असले बाबत खात्रीशीर माहिती मिळालेने, त्यास बिबवेवाडी, बकुळ हॉल समोर पकडून त्याचे ताब्यातुन एक गावठी देशी बनावटीचे पिस्तूल व ०४ जिवंत राऊंड कि. रु. ५०,६००/- चे असे मिळून आल्याने, त्याचे विरुद्ध आर्म्स ऍक्ट ३(२५) व एम पी ए ३७ (१) सह १३५ अन्वये बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई कामी, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदर आरोपीवर या पूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी, जबरी चोरी, दरोड्याची तैय्यारी व आर्म्स ऍक्ट नुसार पुणे शहरामध्ये एकूण १२ गुन्हे दाखल.

सदरची कामगिरी युनिट १, गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार वसावे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस शिपाई गजानन सोनुने, पोलीस नाईक सुधीर माने व पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांनी केली आहे.