Home गुन्हा सरकारवाडा पोलिसांची धाडसी कामगिरी

सरकारवाडा पोलिसांची धाडसी कामगिरी

0

सरकारवाडा पोलिसांची धाडसी कामगिरी…
परवेज शेख सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद महाजन उद्यान परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या सर्फराज उर्फ फिरोज बेग (वय २९) यास अजमेर (राजस्थान) येथे जेरबंद करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे. यामुळे शहरातील विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


सरकारवाडा गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राठोड, हवालदार शेळके, वाघमारे, मरकड, जगदाळे यांनी ही धाडसी कामगिरी केली. शहरात घडणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे निर्देश दिले होते.

त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात (रजिस्टर नं. ३२६/१९) सहभागी असणारा सर्फराज उर्फ फिरोज बेग हा अजमेर येथे असल्याचे खात्रीशीर वृत्त सरकारवाडा पोलिसांना कळाले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे पथक अजमेरला रवाना झाले. तेथे सतत तीन दिवस दबा धरून बसल्यानंतर संशयित हाती लागला. त्यास ताब्यात घेऊन पोलिस पथक नाशिकमध्ये दाखल झाले. फिरोज बेग यास रविवारी न्यायालयात हजर केले असता १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.