Home अश्रेणीबद्ध महिलेच्या खून करणारा आरोपी अटक

महिलेच्या खून करणारा आरोपी अटक

0

पुणे : परवेज शेख दिनांक 23/11/2019 जिजाबाई अंबु भांगरे (वय ८०, रा. साकिरवाडी,ता. जुन्नर, जि. अहमदनगर मूळगाव निमगिरी, खांडेची वाडी, ता. जुन्नर, जि.पुणे ) यांना त्यांच्या रहात्या घरात रस्सीने गळा आवळून ठार मारले व लाकडी खांबाला रस्सीने लटकवले. घरातील लॉकर व जिजाबाईंच्या अंगावरील दागिने असा एकूण ८,५००/- रूपयाचा माल आरोपीने चोरला होता. गुन्हा गंभीर असल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील व उप विभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांना गुन्हा उघडकीस आणण्याबद्दल सूचना दिल्या होत्या.


संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक पद्माकर धनवट याना आदेश दिला होता. त्यावरून धनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, हवालदार सुनिल जावळे, शरद बांवळे, सचिन गायकवाड, पो समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून घटनास्थळाला भेट दिली.
घटनास्थळी भांड्यामध्ये भात शिजायला ठेवला असल्याचे आढळल्याने तो ओळखीचा इसम/नातेवाईकास ठेवला असावा या सुगाव्यावरून बातमीदाराकडून बातमी काढून जिजाबाइ भांगरे यांचा नातेवाईक सुनिल मेमाणे याने पैशाची अडचण असल्याने जिजाबाईंकडे जाऊन पैसे चोरण्याकरता त्यांचेकडे गेल्याने व चोरी करताना जिजाबाईंनी पाहिल्याने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, हवालदार सुनिल जावळे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, दीपक साबळे, गुरु जाधव, नितीन भोर, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे़.