Home शहरे नागपूर ‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला

‘आयआयएम-नागपूर’मध्ये विद्यार्थिनींचा टक्का घटला

0

नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील वर्षीच्या तुलनेत २०१९-२१ च्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाचा टक्का घटला आहे. यंदा ६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. मागील ‘बॅच’मध्ये प्रथमच विद्यार्थिनींची संख्या २० टक्क्यांहून अधिक गेली होती. दुसरीकडे यंदा प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्रेशर्स’ची संख्या काही प्रमाणात वाढलेली आहे.
‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्षे विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींची संख्या २२ टक्के इतकी गेली होती. परंतु या वर्षी ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १२३ प्रवेश असून यातील विद्यार्थिनींची संख्या ही जवळपास १६ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची घट झाली आहे.
‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा २९ महिन्यांचा सरासरी अनुभव
‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी १३ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. तर २८ टक्के विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या ‘बॅच’मधील