Home ताज्या बातम्या आयुर्विम्याच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठे बदल; जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे

आयुर्विम्याच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठे बदल; जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे

0

नवी दिल्ली : येत्या 1 डिसेंबरपासून आयुर्विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामुळे जर तुम्ही नवीन पॉलिसी घेणार असाल तर थोडे दिवस वाट पहावी की लगेचच घ्यावा याचा विचार करावा लागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (इरडा) ही नियम लागू करणार आहे. 


नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे. तर गॅरंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, जरी हप्ता वाढला तरीही ग्राहकांना जास्त सुविधा मिळणार आहेत. 
फिनसेफ इंडियाच्या मृण अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार पेंशन प्लानला ग्राहकाभिमुख बनविले जाणार आहे. मॅच्युरीटी किंवा त्या आधी रक्कम काढण्याबाबतचे नियम सोपे होणार आहेत. मॅच्युरिटीची रक्कम काढण्याचे बंधन 33 टक्क्यांवरून 60 टक्के केले जाणार आहे. 
नव्या नियमांनुसार पॉलिसी घेणार ग्राहक गॅरंटेड रिटर्न घेऊ इच्छितो की नाही, या साठी स्वातंत्र्य असणार आहे. 

युलिप (Ulip) ग्राहकांसाठी मिनिमम लाईफ कव्हर कमी होणार आहे. सध्या एका वर्षाच्या हप्त्याच्या 10 पट होते ते घटवून 7 पट केले जाणार आहे. यामुळे रिटर्न जास्त मिळणार आहे. 
एंडोव्हमेंट प्लान जो कमीत कमी 10 वर्षांसाठी असेल त्यासाठी सरेंडर व्हॅल्यू 3 वर्षांवरून 2 वर्षे करण्यात येणार आहे. 


अनेकदा असे होते की, ग्राहक काही काळानंतर हप्ता भरण्यास अक्षम असतो. तेव्हा पॉलिसी बंद होते. अशा पॉलिसी होल्डरसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर हा ग्राहक त्याचा हप्ता 50 टक्क्यांपर्यंत कमी करून घेऊ शकतो. याशिवाय रिव्हायव्हल प्लॅनलाही दोन वर्षे वाढवून पाच वर्षे केला जाऊ शकतो.