Home गुन्हा वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर केअरटेकरकडून अत्याचार

वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर केअरटेकरकडून अत्याचार

0

कामशेत : इंग्लिश मिडीयम शाळेच्या वसतिगृहात एका अल्पवयीन मुलावर दोन महिन्यापूर्वी एक महिन्यात शाळेच्या केअरटेकरने मुलाला धमकावत बलात्कार केला असल्याची फिर्याद त्याच्या वडिलांच्या बहिणीने दिली आहे. पीडित मुलाला आई वडील नसून त्याच्या नातेवाईकांनी त्याला शिक्षणासाठी या शाळेत ठेवले होते.

याप्रकरणी कामशेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या बाहेरील या शाळेत १० सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या दरम्यान दोन वेळा या मुलावर बलात्कार करण्यात आला. शाळेचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांनी पिडीत मुलाच्या नातेवाईक यांना फोन करून तुमच्या मुलावर बलात्कार झाला आहे. मात्र, हा शाळेच्या बाहेर झाला आहे, हि बाब तुम्ही कोणाला सांगू नका. त्यामुळे पालकांनी मुलास मिरारोड मुंबई येथे घेवून गेले. काही दिवस तो शांत व कोणाशी काही बोलत न्हवता. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला काही विचारले नाही. पण तो नॉर्मल झाल्यानंतर त्याला घरच्यांनी घडलेला प्रकार विचारला असता सर्व प्रकार उघडीस आला.

यावेळी पालकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ यांना हा प्रकार सांगितला असता त्यांचे सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या शोभा महासिद्ध बशेट्टी ह्यांनी त्यांच्या घरी जावून विचारपूस केली. शिवाय घडलेला प्रकार खरा असल्याची खात्री पटल्यानंतर नातेवाईक फिर्यादी व त्यांचे इतर नातेवाईक यांच्यासह सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. ती कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून याप्रकरणी शाळेतील बोर्डिंगचे केअरटेकर रसुल सैफन शेख ( वय ३२, रा. अहिरवडे, मावळ ) व स्कुलचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रसूल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड करीत आहे.