Home शहरे पुणे 17 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा 2019

17 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा 2019

0

पुणे : परवेज शेख 17 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा 2019 चे उद्घाटन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे येथे दिनांक 27/11/2019 रोजी सायंकाळी 16:30 वा. श्री डॉ. के व्यंकटेशम् सर पोलीस आयुक्त, पुणे शहर व श्री. अतुलचंद्र कुलकर्णी सर अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते पार पडला.

सदर कार्यक्रमांमध्ये पोलीस हवालदार इक्बाल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा व अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून 7 सुवर्ण, 4 रौप्य व 9 कास्य पदके तसेच लखनऊ उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या 62 वा अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावामध्ये सुवर्णपदकासह भारत देशात प्रथम क्रमांक मिळवून अखंड महाराष्ट्र राज्य पोलिस दलाची मान भारत देशात उंचावली आहे. त्याबद्दल श्री. डॉ. के व्यंकटेशम् सर यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला आहे.