Home ताज्या बातम्या पोलीस बडतर्फी शैलेश जगताप प्रकरणी अनुसूचित जाती आयोगाची पोलिसांना नोटीस

पोलीस बडतर्फी शैलेश जगताप प्रकरणी अनुसूचित जाती आयोगाची पोलिसांना नोटीस

0

पुणे : गैरवर्तन केलेल्याने पुणे शहर पोलीस दलातून शैलेश जगताप यांना बडतर्फ केल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे पोलीस दलाला नोटीस पाठवली आहे.
शैलेश जगताप आणि परवेज जमादार यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याविरुद्ध हवालदार शैलेश जगताप यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागून आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले आहे पुणे पोलीस आयुक्तांसह ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हा तक्रार अर्ज करण्यात आला आहे.

“एकतर्फी झालेल्या पोलीस बडतर्फी प्रकरणी शैलेश जगताप यांनी पोलीस प्रशासन विभागावरील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सदरील त्यांच्याजवळ असलेले पुरावे पुनश्च पडताळणी करून त्यांना पोलीस प्रशासन विभागाकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”


या प्रकरणात ९ सहकारी साक्षीदारांनी आमच्या बाजूने साक्षी दिल्या असल्या तरी त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच आपल्याला बडतर्फ करायचा अधिकार सह पोलिस आयुक्तांना आहे असे असताना अप्पर पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केले असून हा आपल्यावर अन्याय झाल्याचे आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे अर्ज केला आमच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आयोगाने पोलिस आयुक्तांना विविध मुद्द्यांवर १५ दिवसात खुलासा मागविला आहे पुढील तपासासाठी विविध मुद्द्यांवरील माहिती देण्यास सांगितले आहेत या अवधीत उत्तर मिळाले नाही. तर आयोगामार्फत संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक डॉक्टर बेडेकर यांनी २१ नोव्हेंबर च्या पत्रान्वये हा खुलासा मागविला आहे.