Home ताज्या बातम्या नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र च्या वतीने नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र च्या वतीने नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन

0

मुंबई : (डॉ विनोद खाडे)
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी जनतेला बघायला मिळाल्या असून शेवटी मुख्यमंत्री पदाची माळ अनपेक्षित पणे उद्धवजी ठाकरे यांच्या गळ्यात पडली, आणि “जनतेचा मुख्यमंत्री’ राज्याला मिळाला,आता सर्व ठीक होईल अशी आशा जनतेला वाटू लागली .
नुकत्याच विधी मंडळ व मंत्रालय वार्ताहर कक्षात पत्रकारांशी नूतन मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र च्या राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांनी नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले,व लवकरच नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ची टीम ही उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगितले