Home ताज्या बातम्या माणगांव तालुक्यातीलहोडगाव येथे मोठया प्रमाणावर डबर व माती उत्खनन, शंभर ब्रास राॅयल्टीच्या परवान्याच्या नावाखाली हजारो ब्रास चे राजरोस पणे उत्खनन : संबंधित विभागाची डोळेझाक

माणगांव तालुक्यातीलहोडगाव येथे मोठया प्रमाणावर डबर व माती उत्खनन, शंभर ब्रास राॅयल्टीच्या परवान्याच्या नावाखाली हजारो ब्रास चे राजरोस पणे उत्खनन : संबंधित विभागाची डोळेझाक

0

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) माणगांव तालुक्यातील होडगाव या ठिकाणी शंभर ब्रासच्या राॅयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास माती व डबरचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. सदर अवैध उत्खननाकडे महसूल खात्याने दुर्लक्ष केले आहे, होडगाव या ठिकाणी एकाच परिसरात जवळपास लागून पाच ते सहा काॅ-या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू असून त्यामुळे या संपूर्ण परिसरात धूळीचे प्रदूषण होत असून जनतेला यामुळे नाहक त्रास होत आहे.

    माणगांव तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन डबर  असा प्रकार चालू आहे. होडगाव या विभागाचे संबंधित महसूल खात्याचे मंडळ अधिकारी श्री नाखवा यांच्याकडे प्रतिनिधीनी  संपर्क साधला असता उत्खनन करणारे मालक यांनी केवळ शंभर ब्रासची रॉयल्टी शासनाकडे भरली असून जर मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असेल तर त्याठिकाणी  जाऊन मोजमाप घेऊन  संबंधित मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी प्रतिनिधींजवळ बोलताना सांगितले.तसेच या काँरीवर काम करणारे कामगार हे परप्रांतीय असून या कामगारांसोबत  त्यांची पाच ते सहा वर्षाची लहान लहान मुलं सुद्धा हे काम सुरु असताना या माती व खाणी मध्ये खेळताना  पाहायला मिळत आहेत. काहीवेळेस काॅरीच्या ठिकाणी दगड किवा मातीचा ढीगारा अंगांवर पडून अनुचित प्रकार घडन्याची मोठी शक्यता देखील घडू शकते. या ठिकाणी असणारी लहान लहान मुले ज्यांचे शिक्षण घेण्याचे वय असताना देखील आई वडिलांसोबत काम करताना पाहायला मिळत आहेत. याकडे शासकीय अधिकारी यांचे देखील जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे. 

    दिवसा आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा काम होत असल्यामुळे या परिसरात राहत असणाऱ्या ग्रामस्थांना मशीनच्या आवाजाने देखील मोठा त्रास होत असल्याचे या गावचे शेतकरी तसेच माणगांव तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांनी प्रतिनिधींजवळ बोलताना सांगीतले तसेच या काही भागात अनाधिकृत माती व डबर काॅरी उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यावर योग्य ती कारवाई माणगांव तहसीलदार यांनी करावी अशी मागणी देखील ते करणार आहेत.