Home गुन्हा रेल्वेतील प्रवाशांचे तिकीट कनफॉर्म करून देण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारी टोळी गजाआड

रेल्वेतील प्रवाशांचे तिकीट कनफॉर्म करून देण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारी टोळी गजाआड

0

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हयातील फिर्यादी नामे रहमानअली हजरत अली, राह. विमाननगर पुणे हे दि.२८ डिसेंबर रोजी पश्चिम बंगाल येथे गावी जाणेकरीता सायंकाळी १९:१५ वा. पुणे रेल्वे स्टेशन येथे आले असता एका इसमाने त्यांनी काढलेले जनरल तिकीट कनफॉर्म करून देतो असे सांगुन विश्वास संपादन करून त्यांचेकडील विवो कपंनीचा मोबाईल व युनियन बँकेचे एटीएम कार्ड काढुन घेवुन एटीएम चा वापर करून ४४ हजार रूपये. रोख रक्कम काढुन घेवुन त्यांची ५१ हजार ९९० रुपये.ची फसवणुक केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता वत्या प्रमाणे गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झालेल्या माहितीच्या अणुषंगाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा रचुन आरोपी नामे १) चंदनकुमार श्रीरामबिलास साह, वय २८ वर्षे, राह. गंगापुर, पोष्ट, पताही, तहसील बिशुनपुर, जि. मुजफ्फरपुर, राज्य. बिहार. २)सुनिल महेश साह, वय २८ वर्षे, राह. गाव. नरमाधनशी, पोष्ट, नारमा, तहसीलअहय्यापुर जि. मुजफ्फरपुर, राज्य.. बिहार. यांना शिताफीने ताब्यात घेवून दि. ०१ जानेवारी रोजी २०:२५ वा. अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार असुन त्यांचा शोध चालु आहे सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक सुरेशसींग गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक काळे, पो. हवा. भिमा हगवणे, प्रशात डोईफोडे, पो. शि. दिनेश गवळी, चिंताकोटे व महिला पो.शि बेबी थोरात यांनी केली आहे