Home गुन्हा पिकनिकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

पिकनिकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

0

गुरुग्राम: नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देश २०२० चे स्वागत करत असताना दुसरीकडे कासन गावातील अरवली येथे धक्कादायक घटना घडली आहे. १७ वर्षीय मित्रांसोबत नववर्षानिमित्त पिकनिकसाठी गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे .

ही धक्कादायक घटना हरयाणातील गुरुग्राममधील मानेसर टाउनच्या कासन गाव येथील असल्याचं समजतं आहे. १६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या १७ वर्षीय मित्रासोबत अरवली येथील डोंगरळ भागात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दोन नराधमांनी तिच्यावर नजर पडली आणि तिचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र हे नववर्षानिमित्त कासन गावाजवळील डोंगरानजीक पिकनिकसाठी गेले होते. त्याचवेळी ही घटना घडली. जेव्हा दोघे मित्र सेल्फी घेत होते तेव्हा आरोपी श्रवण कुमार (३४) आणि नितेश मिश्रा (३०) यांची मुलीवर नजर पडली. त्यावेळी मुलीला पाहताच दोनही आरोपींची नियत बदलली. त्यांनी मुलगी आणि तिच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे मुलीच्या मित्राने त्यांना विरोध करणं सुरु केलं. मात्र, दोन्ही आरोपींनी मिळून मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलीचं अपहरण करुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. मिश्राने मुलाला जवळच्या ठिकाणी मारून फेकून दिले आणि कुमारने मुलीला गंभीर परिणाम होईल अशी धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला.