Home ताज्या बातम्या बारमतीमध्ये कृषीप्रदर्शन, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन

बारमतीमध्ये कृषीप्रदर्शन, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन

0

पुणे :  बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येणार्‍या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 16 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान देशातील एकमेव प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी आवर्जून पाहण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेती आणि शेतकरी याविषयाची सकारात्मक दृष्टीकोन सर्वांसमोर यावा या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले असून हे प्रदर्शन भारतातील पहिलेच असे अधुनिक तंत्रज्ञानाने युक्त व उभ्या पिकांसह असलेले पाहावयास मिळणार असून त्याकरीता बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील 110 एकर क्षेत्रात यासाठी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्याची तयारी सुरू आहे. यामध्ये सर्व पिकांची तंत्रज्ञान न वापरता व तंत्रज्ञान वापरलेली अशी दोन- दोन प्रात्यक्षिके शेतकरऎयांना पाहता येणार असून त्यातून तंत्रज्ञानाचे नेमके दृश्य परिणाम अभ्यासता येतील. शेतकरी एखादे नवे तंत्रज्ञान त्याचा प्रत्यक्ष वापर झालेला व त्याचा परिणाम झालेला पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत, नेमका तोच धागा पकडून नवनवे बियाणे, खते, औषधे बाजारात आणून त्याचा खूप परिणाम होतो अशी जाहीरात करणारऎया कंपन्यांनाही ते सिध्द करण्यासाठी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रे उपलब्ध करून दिली आहेत. ती थेट पाहता येतील. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानानुसार झालेले नवे शोध येथील शेतीतील प्रत्यक्ष परिणामातून शेतकरयांपर्यंत पोचविणारे हे भव्य प्रदर्शन असेल असा दावा अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केला.

या कृषी प्रदर्शनात एअरोपॉनिक्स पद्धतीने विषमुक्त भाजीपाला उत्पादन, अॅक्वापॉनिक्स पद्धतीने मासे व भाजीपाला उत्पादन कसे करावे, याशिवाय औषधी वनस्पती लागवड आणि बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन होणार आहे.